• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशीव महिला शिवसेनेची धुरा आता सुवर्णा पाटलांच्या खांद्यावर; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते नियुक्तीपत्र!

Sayyad Musa by Sayyad Musa
May 15, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशीव महिला शिवसेनेची धुरा आता सुवर्णा पाटलांच्या खांद्यावर; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते नियुक्तीपत्र!

शिवसेना जिल्हा संघटन प्रमुखपदी सुवर्णा पाटील

लोहारा-प्रतिनिधी -शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कानेगाव जि प सदस्या सौ. सुवर्णा सतीशराव पाटील यांची शिवसेना महिला सेना धाराशीव जिल्हा संघटन प्रमुखपदी (संपूर्ण धाराशीव जिल्हा कार्यक्षेत्र) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना. प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते सुवर्णा पाटील यांना हे अधिकृत नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना धाराशीव लोकसभा प्रमुख आनंद पाटील, सतीशजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे यासाठी व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या


चौकट

‘ नवनियुक्त जिल्हा संघटन प्रमुख सौ. सुवर्णा पाटील म्हणाल्या, “पक्षप्रमुख आणि पालकमंत्री महोदयांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. ‘बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून संपूर्ण जिल्ह्यात महिला संघटन अधिक मजबूत करू’, तसेच धाराशीव जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. कुठलाही मतभेद न ठेवता सर्व वरिष्ठ नेत्यांना तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक ताकदीने फडकवू, हाच माझा निर्धार आहे.


अध्यक्ष, उपाध्यक्ष अन् सभापती निवडणुकीत डावलले; तरीही पक्षनिष्ठा कायम!धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीच्या वेळी सुवर्णा पाटील यांना ऐनवेळी डावलण्यात आले होते. या राजकीय घडामोडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. मात्र, मूलतः चळवळीतील कार्यकर्ते आणि पक्षाशी अत्यंत प्रामाणिक असलेले नेतृत्व असल्याने आनंद पाटील जराही डगमगले नाहीत. या निवडणुकीच्या वेळी पद डावलले गेले तरी त्यांनी नाराज न होता पक्षाचे काम अधिक जोमाने सुरू ठेवले. पद गेले तरी जनसंपर्क न तोडता त्यांनी कानेगाव मतदारसंघ आणि लोहारा तालुक्यात स्वतःची एक वेगळी ‘क्रेझ’ आणि विश्वासार्हता निर्माण केली.
आनंद पाटील यांचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा ना एकनाथ भाई शिंदे आणि धाराशिव पालकमंत्री मा ना प्रतापजी सरनाईक यांच्याशी अत्यंत जवळचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या भक्कम पाठबळाच्या जोरावर त्यांनी कानेगाव मतदारसंघ आणि संपूर्ण लोहारा तालुक्यामध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. शेतकरी, महिला आणि तरुण मतदारांच्या प्रलंबित प्रश्नांचा शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की तरुणांच्या रोजगाराचा विषय, आनंद पाटील नेहमीच जनसामान्यांसाठी धावून गेले आहेत. त्यांच्या याच अभ्यासू वृत्तीची, प्रामाणिकपणाची आणि दांडग्या जनसंपर्काची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर सुवर्णाताईंना थेट संपूर्ण जिल्ह्याचे महिला संघटन सांभाळण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

“काम थेट राज्यपातळीवरून मंजूर करून आणणारे नेतृत्व!”

मतदारसंघात मोठी चर्चासध्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासह विशेषतः लोहारा तालुक्यातील तरुण, नागरिक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये आनंद भैय्या पाटील यांच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. “आनंद भैय्या हे लोहारा तालुक्याचे एक उमलते आणि अत्यंत वजनदार नेतृत्व आहे. त्यांचे राज्यपातळीवर मजबूत वजन असल्याने ते स्थानिक पातळीवरील रखडलेली कामे थेट मंत्रालय आणि मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने मंजूर करून आणू शकतात,” अशी मोठी अपेक्षा आणि सार्थ विश्वास मतदारसंघातील नागरिक व तरुणांमधून व्यक्त केला जात आहे. या वाढत्या जन विश्वासामुळे आनंद पाटील यांची धाराशिव जिल्हयासह तालुक्यातील राजकीय लोकप्रियता कमालीची वाढली आहे.


“सुवर्णा पाटील यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक स्तरातून प्रचंड आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या

Next Post

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज व फिजिक्स वाला यांच्यावतीने

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज व फिजिक्स वाला यांच्यावतीने

भूम तालुक्यातील देवळाली येथे भव्य कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007614
Total views : 12302

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In