डिकसळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेकडून सौ. लता रणदिवे यांनी केली उमेदवारीसाठी मागणी .
➡️ सर्वसामान्यांचा आवाज जिल्हा परिषदेत पोहोचवण्याचा निर्धार
कळंब | प्रतिनिधी
कळंब : – डिकसळ जिल्हा परिषद मतदारसंघासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना (मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गट) यांच्याकडून सौ. लता बोधराज रणदिवे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अधिकृतपणे उमेदवारीसाठी मागणी केली आहे.
कळंब येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेचे लोकनेते अजित दादा पिंगळे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी .शिवाजी आप्पा कापसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तथा माजी नगराध्यक्ष कळंब.शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. रणदिवे यांनी उमेदवारी मागणी करताना सांगितले की, डिकसळ परिसरातील मूलभूत प्रश्न, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या प्रश्नांकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज थेट जिल्हा परिषदेत पोहोचवून न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
डिकसळ परिसरासाठी विकासाचा स्पष्ट अजेंडा
उमेदवारी मागणी करताना सौ. रणदिवे यांनी पुढील विकासात्मक मुद्द्यांवर भर दिला असून गावोगावी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना अंतर्गत रस्ते, शेतरस्ते व दळणवळणासाठी भक्कम रस्ते नेटवर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना आधुनिक सुविधा व मनुष्यबळ
शाळा व अंगणवाड्यांच्या इमारतींचा दर्जा उंचावणे
महिला, शेतकरी व युवकांसाठी स्वावलंबन योजना व रोजगार संधी
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा पारदर्शक व न्याय्य वापर
शिवसेनेतून विकासाला गती मिळणार – अजित दादा पिंगळे
यावेळी लोकनेते अजित दादा पिंगळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विकासाला प्राधान्य देणारी पक्षसंस्था आहे. सौ. लता रणदिवे यांची उमेदवारी डिकसळ मतदारसंघातील सर्वसामान्यांसाठी न्याय देणारी ठरेल.
शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, जनतेसाठी निर्णय आणि विकासासाठी ठोस काम हेच धोरण घेऊन ही उमेदवारी मागणी करण्यात आल्याने, डिकसळ मतदारसंघात नव्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.




















Total views : 4448