शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .
शिंगोली (ता. …) – शिंगोली ग्रामपंचायत पॅनलमधून ११ पैकी ९ सदस्य निवडून आणत प्रभावी नेतृत्व सिद्ध करणारे उपसरपंच ॲड. मनोज मधुकर मगर आणि जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार .प्रांजली मनोज मगर (LLB) यांची उमेदवारी सध्या तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. विकासा भिमुख दृष्टिकोन, मजबूत संघटन क्षमता आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे.
ॲड.मनोज मगर यांना वकिली क्षेत्रातील १० वर्षांचा अनुभव असून, मागील पंचायत समिती निवडणुकीतील प्रत्यक्ष अनुभव, दांडगा मतदारसंघ संपर्क आणि प्रशासकीय बाबींचे सखोल ज्ञान ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. शिंगोली ग्रामपंचायतीत पॅनलच्या माध्यमातून मिळवलेले यश हे त्यांच्या संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
जिल्हा परिषद विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सांगड घालत, मतदारसंघातील तरुणांचा विश्वास संपादन करणारे, जनतेचा आवाज बनलेले नेतृत्व, तसेच सर्व जातीय व धार्मिक सलोखा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रांजली मगर यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी मतदारसंघातून जोरदार मागणी होत असल्याचे चित्र आहे.
सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, तसेच शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव यांसह प्रत्येक सार्वजनिक व सामाजिक उत्सवात सक्रिय सहभाग ही त्यांची कार्यशैली जनतेत विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे.
त्यांची उमेदवारी ही विकासाच्या वाटचालीला निश्चितच गती देणारी ठरेल, असा ठाम विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिंगोलीसह संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष या नेतृत्वाकडे लागले आहे.




















Total views : 4448