पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा
अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद, नियोजनावर भर
( सय्यद कलीम मुसा )
पाडोळी (आ) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडोळी (आ) येथे स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी बैठक पार पडली. या बैठकीस अर्चनाताई पाटील उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला.
बैठकीत निवडणूकपूर्व नियोजन, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि गटशक्ती मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अर्चनाताई पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक करत, “संघटित प्रयत्न आणि प्रामाणिक परिश्रमातून निश्चितच सकारात्मक परिणाम साध्य होऊ शकतो,” असे मत व्यक्त केले.
या बैठकीस श्री. सुधाकर गुंड गुरूजी, श्री. उध्दवबाबा पाटील, श्री. बाबुराव पुजारी, सौ. प्रितीताई कदम, श्री. निळकंठ पाटील, रणदिवे मॅडम, श्री. बाळासाहेब एकंडे, श्री. दत्ताभाऊ सोनटक्के, श्री. संगमेश्वर स्वामी, श्री. अजित पवार, श्री. तानाजी बापू गायकवाड, श्री. काकासाहेब पाटील, श्री. रावसाहेब गुंड, श्री. अमोल गुंड, श्री. शरद गुंड, श्री. रामदास गुंड, श्री. भरत गुंड, श्री. शाहू महाराज खराडे, श्री. अमोल खराडे, श्री. वर्धमान शिरगिरे, श्री. चौरे महाराज, श्री. संपत रणखाम, श्री. महादेव सुरवसे, श्री. संजय दळवी, श्री. महेबूब शेख, श्री. बालाजी गोरे, श्री. परमेश्वर शिंदे, श्री. लक्ष्मण मुळे, श्री. जयराम ढोरमारे, श्री. धनंजय जावळे, श्री. नागनाथ पवार, श्री. अर्जुन पाटील, श्री. दयानंद शिंदे, श्री. दिनेश देशमुख, श्री. मनोज पाटील, श्री. हणुमंत कदम, श्री. किरण मोरे, श्री. शिवाजी पसारे, श्री. ज्ञानेश्वर जंगाले, श्री. आबासाहेब शिंदे, श्री. दादासाहेब गुंड, श्री. ऋषी भैय्या गुंड, श्री. रूपेश गुंड, श्री. गौरव गुंड, श्री. रामेश्वर गुंड, श्री. शितल कासार यांच्यासह विविध बुथ प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्चनाताई पाटील यांच्या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लोकांचा वाढता प्रतिसाद आणि संघटनात्मक चर्चा पाहता निवडणुकीच्या पूर्वतयारीला गती मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवले.

























Total views : 4448