• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज व फिजिक्स वाला यांच्यावतीने

Sayyad Musa by Sayyad Musa
May 16, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेज व फिजिक्स वाला यांच्यावतीने दहावीतील गुणवंतांचा भव्य सत्कार

धाराशिव : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेज व फिजिक्स वाला, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा, औसा व बार्शी तालुक्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच प्रत्येक शाळेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या एकूण ४३० हून अधिक विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि ४० हून अधिक मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात श्री. बळीराम पवार यांनी फिजिक्स वालाच्या यशस्वी वाटचाल व सुविधा याविषयी माहिती दिली. यावेळी अंकित कुमार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर विजय वर्मा यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली.
संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या १९६२ पासूनच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत हजारो डॉक्टर, इंजिनिअर्स व अधिकारी घडविल्याचा उल्लेख केला. तसेच जेईई, नीट आणि आयआयटी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही, यासाठी संस्थेने धाराशिवमध्ये “फिजिक्स वाला” (PW) हा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. धाराशिवचा विद्यार्थी धाराशिव मध्येच घडला पाहिजे व आपला एक वेगळाच ‘धाराशिव पॅटर्न’ तयार झाला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ वाडकर (तहसीलदार, देवणी, जि. लातूर) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ आदित्य पाटील, संचालक उदयसिंह राजे, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक यशवंत इंगळे, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप, सूर्यकांत पाटील, कमलाकर पाटील तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धाराशीव महिला शिवसेनेची धुरा आता सुवर्णा पाटलांच्या खांद्यावर; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते नियुक्तीपत्र!

Next Post

भूम तालुक्यातील देवळाली येथे भव्य कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

भूम तालुक्यातील देवळाली येथे भव्य कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण

गोजवाडा, ता. वाशी : तालुक्यातील गोजवाडा येथे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007615
Total views : 12303

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In