भूम तालुक्यातील देवळाली येथे भव्य कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण
भूम : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते भूम तालुक्यातील देवळाली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, कुस्तीप्रेमी व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
त्यानंतर ईट येथील भूम बाजार समितीचे सभापती श्री. प्रवीण देशमुख यांच्या नवीन वाहनाचे पूजन आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी आमदार डॉ. सावंत यांचे जल्लोषात स्वागत केले.





















Total views : 12305