मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी
वाशी, प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे शेंडी येथील मुख्य रस्त्यावरील वीज वितरण कंपनीची (एमएसईबी) डीपी मागील तीन दिवसांपासून पडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागाला माहिती देण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मुख्य रस्त्यावर डीपी पडून असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व संबंधित यंत्रणेला आजच दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वी वीज वितरण कंपनीने तत्काळ कार्यवाही करून डीपी उभी करावी व परिसर सुरक्षित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Total views : 12296