ढोकी – प्रतिनिधी
ढोकी येथील आझाद नगरमध्ये हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिसरातील शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या शिक्षणाची प्रेरणा वाढवण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच टिपू सुलतान जयंती समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती साजरी करताना ढोकी येथील प्रतिष्ठित नागरिकांनीही उत्स्फूर्त हजेरी लावली.
जयंती निमित्त आयोजित शालेय साहित्य वाटपामुळे मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि एकोपा यामुळे कार्यक्रमाला विशेष यश मिळाले.






















Total views : 4449