येरमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात ४१९ जणांना योजनांचा लाभ
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –
महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अभियानांतर्गत कळंब तालुक्यातील येरमाळा येथे शिबिर संपन्न झाले.
दि. ७ रोजी शहीद जवान शंकर बारकुल सभागृहात या शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उपस्थित ग्रामस्थांना शासनाने घेतलेल्या नविन निर्णयांची माहिती दिली. त्यामध्ये घरे बांधताना अकृषी परवानगी ची आवश्यकता नाही, अकृषी कर माफ करण्यात आला आहे, तुकडेबंदी सुधारणा, घरकुल लाभार्थ्यांना वाळु वाटप या प्रकारच्या सर्व निर्णयांची माहिती देण्यात आली.
जनतेच्या दारी प्रशासन या संकल्पनेनुसार नागरिकांना महसुल कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागु नयेत व प्रलंबीत प्रकरणाचा जलद निपटारा व्हावा या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे असे कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी सांगितले.
या शिबिरांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या व तक्रारींवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे ग्रामविकास विभाग, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख, राज्य परिवहन विभाग यांचे आरोग्य विभाग यांचे सर्व अधिकारी या शिबीरासाठी उपस्थित होते. या वेळी जवळपास ५०० लोकांनी सहभाग नोंदवला त्यापैकी ४१९ लोकांना या शिबीरातील योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये नविन शिधापत्रिका, शिधापत्रिका दुरुस्ती, जन्म नोंद, मतदार यादीत नाव समाविष्ट किंवा नावाची दुरुस्ती, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, अनुदान ई केवायसी, सातबारा वाटप किंवा दुरुस्ती, रोजगार हमी मजुरांची ई केवायसी व जॉब कार्ड, लाडकी बहीण ई केवायसी, विवाह नोंदणी, आधार अपडेट, एस.टी. महामंडळ सवलतीचे कार्ड वाटप, आयुष्मान भारत कार्ड वाटप अशा अनेक योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याच्या दृष्टीने तालुक्यातील विविध मंडळ स्तरावर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबीरावेळी तहसीलदार हेमंत ढोकले, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर सर,नायब तहसीलदार गोकुळ मराठी, सहाय्यक गटविकास अधिकारी सुकाळे मॅडम,मंडळ अधिकारी एन.डी.नागटिळक, पं. सं. सदस्या वृषाली पाटील, प्रशासकीय सरपंच प्रिया बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, ग्रामपंचायत चे सदस्य, तलाठी साधना गायकवाड महसूल अधिकारी येरमाळा, मंगेश नागरे ग्राम महसूल अधिकारी रत्नापूर व सापनाई,महेश मुकदम ग्राम महसूल अधिकारी शेलगाव ज., प्रविण जमादार ग्राम महसूल अधिकारी चोराखळी, महसूल सेवक संजीव पवार, नारायण पवार, पोलीस पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.





















Total views : 6348