औसा येथे ७ वर्षीय शेख आनफ खूदूस याचा पहिला रोजा पूर्ण
औसा (प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्यात रोजा (उपवास) धरणे हे इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य मानले जाते. लहान वयातच धार्मिक संस्कारांची जपणूक करत औसा येथील कालन गल्ली परिसरातील शेख आनफ खूदूस (वय ७ वर्षे) याने यंदा प्रथमच रोजा पूर्ण केला.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत संयम, श्रद्धा आणि शिस्त पाळत आनफने आपला पहिला रोजा यशस्वीरीत्या पार पाडला. इतक्या लहान वयात दाखवलेल्या या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबीयांनी त्याचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या.
रमजान महिन्यात रोजा ठेवून अल्लाहची इबादत करणे, नमाज अदा करणे आणि चांगल्या आचरणाचे पालन करणे याला विशेष महत्त्व आहे. शेख आनफच्या या कृतीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

















Total views : 5932