( सय्यद कलीम मुसा )
प्रभाग १७ मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सय्यद नादेरुल्लाह हुसैनी (सर) यांची सामाजिक कार्याची भक्कम छाप .
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.१७ मध्ये काँग्रेस पक्षाने सय्यद नादेरुल्लाह हुसैनी (सर) यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या दीर्घकाळाच्या सामाजिक कार्याची आज सर्वत्र चर्चा आहे.
सय्यद हुसैनी सर हे पूर्वी नगरसेवक म्हणूनही कार्यरत राहिले असून नागरी समस्यांपासून ते वैयक्तिक अडी-अडचणीपर्यंत तत्परतेने धावून जाणारा कार्यकर्तेशील स्वभाव ही त्यांची विशेष ओळख मानली जाते. परिसरातील अनेक नागरिक त्यांना “अडीअडचणीला तत्काळ धावून जाणारे व्यक्तिमत्त्व” म्हणून संबोधतात.
सामाजिक कार्यात सातत्य ठेवत सलग अकरा वर्षे त्यांनी ५१ विवाह सोहळ्यांचे आयोजन करून अनेक कुटुंबांना सामाजिक आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी समस्यांवर त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांच्या या कार्याचे प्रभागात विशेष कौतुक होते.
स्थानिक नागरिकांच्या मते, “आमच्या अडीअडचणीला वेळ न दवडता धावून येणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस” अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.
आचारसंहितेची पूर्णपणे काळजी घेत, कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याची चर्चा होताना दिसत आहे. प्रभागात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता व्यक्त होत असून, यामुळे प्रभागातील वातावरण अधिक सकारात्मक झाले आहे.





















Total views : 4449