• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

Sayyad Musa by Sayyad Musa
June 3, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
353
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठक
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
मुंबई, प्रतिनिधी : वडार समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. लातूर येथे पार पडलेल्या वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात समाजबांधवांनी मांडलेल्या विविध मागण्या आणि समस्यांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसंदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तांडा वस्तीच्या धर्तीवर ‘वडार वस्ती सुधार योजना’ सुरू करणे, समाजबांधवांना जातीचे तसेच इतर आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देणे, वडार समाजातील नागरिकांची कामगार म्हणून नोंदणी करणे, उद्योग-व्यवसायासाठी विनातारण बीज भांडवली कर्ज उपलब्ध करून देणे यासह विविध महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
समाजाच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याबाबत मंत्री अतुल सावे यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. शासन वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून सामाजिक न्याय आणि विकासाच्या प्रक्रियेत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
वडार समाजाच्या विकासासाठी सुरू असलेला हा पाठपुरावा निश्चितच समाजबांधवांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी संचालक सोनाली मुळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव दिनेश चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव नि. भा. मराळे, सहकार विभागाचे उपसचिव विजय भोसले, शिवाजी चव्हाण, कक्ष अधिकारी व्ही. शि. कदम, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, नितीन वाघमारे, भाजपा भटके विमुक्त सरचिटणीस रविंद्र शिंदे, वडार समाजाचे कार्याध्यक्ष बाळाराम वारकर, रेश्मा जाधव, राजू जाधव, सागर चौघुले, एस. यू. जाधव, प्रभाकर गवारे, कामिनी सकरू, भरत विटकर, दिलीप गुंजाळ, शिवाजी ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्रीशेखर विजयानंद साखरे यांची नियुक्ती

Next Post

पार्किंगच्या नावाखाली यात्रेकरूंची लूट थांबणार का?येरमाळा पोलीस ठाण्याच्या नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर अवैध धंदे, मटका-जुगार, चोरी आणि मारहाणीचे मोठे आव्हान

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

पार्किंगच्या नावाखाली यात्रेकरूंची लूट थांबणार का?येरमाळा पोलीस ठाण्याच्या नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर अवैध धंदे, मटका-जुगार, चोरी आणि मारहाणीचे मोठे आव्हान

जीवनदानासाठी मदतीचा हात; किडनी प्रत्यारोपणासाठी आमदार तानाजीराव सावंत यांचे आर्थिक सहाय्य"आंबीच्या संतोष गांडाळ यांना दिलासा; सामाजिक बांधिलकीचा पुन्हा प्रत्यय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008868
Total views : 14007

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In