• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 19, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

सत्ता विरुद्ध जनतेची लढाई; विधान परिषदेत महाविकास आघाडीचा विजय निश्चित : महेश देशमुख

Sayyad Musa by Sayyad Musa
June 18, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

सत्ता विरुद्ध जनतेची लढाई; विधान परिषदेत महाविकास आघाडीचा विजय निश्चित : महेश देशमुख

धाराशिव : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणूक 2026 ही केवळ उमेदवारांमधील निवडणूक नसून सत्ताधारी व्यवस्थेविरोधात जनतेच्या भावना व्यक्त करणारी लढाई आहे. मजूर, शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीला 600 हून अधिक मते मिळतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी व्यक्त केला.
धाराशिव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, खलील सय्यद, राजेंद्र शेरखाने, सरफराज काझी, मिनिल काकडे, महेबुब पटेल, गणेश पवार, संकेत पडवळ, अग्निवेश शिंदे, शेखर घोडके, रोहित बागल, अभिजीत बागल, शिवाजी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, राज्यातील सध्याच्या सरकारबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाढती महागाई, रोजगाराच्या संधींचा अभाव, शिक्षण क्षेत्रातील अनिश्चितता, युवकांच्या भवितव्याशी खेळणारे निर्णय आणि महिला सुरक्षेचे गंभीर प्रश्न यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शेतकरी, मजूर आणि कष्टकरी वर्गाला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
ते पुढे म्हणाले की, नीटसारख्या स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणारे घोळ, पारदर्शकतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेली तडजोड यामुळे तरुण पिढीमध्ये असंतोष वाढत आहे. शासनाची नीतिमत्ता आणि निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे. अशा परिस्थितीत ही निवडणूक जनभावनांची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व मतदार घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण असून विजयासाठी आवश्यक असलेल्या ‘मॅजिक फिगर’पेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजकारण अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि जनहितवादी व्हावे, हीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे सांगताना देशमुख यांनी सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी व्हावा, अन्यथा मतदार त्याला योग्य उत्तर देतील, असे स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीच्या कारभारावर जोरदार टीका करत जनतेच्या प्रश्नांवर आधारित राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात मतदारांचा कौल परिवर्तनाच्या बाजूनेच राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

लोहरा परिसरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक प्रहार१२ संशयित ताब्यात; ९.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

Sayyad Musa

Sayyad Musa

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

सत्ता विरुद्ध जनतेची लढाई; विधान परिषदेत महाविकास आघाडीचा विजय निश्चित : महेश देशमुख

June 18, 2026

लोहरा परिसरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक प्रहार१२ संशयित ताब्यात; ९.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

June 17, 2026

June 17, 2026

परंड्यात ANTF ची धडक कारवाई; ५७ हजारांहून अधिक किमतीच्या अंमली गोळ्यांसह एक जण जेरबंद

June 16, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009084
Total views : 14319

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In