चैतन्य देशमुखांना प्रभाग दहा मधील धनगर समाजाचा वाढता पाठिंबा .
➡️ धनगर समाजाचे नेते श्रीकांत गाढवे व दिनेश गडदे यांचा चैतन्य देशमुख यांना जाहीर पाठिंबा .
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : मोहोळ नगरपरिषद २०२५ च्या निवडणूकीसाठी युवा उद्योजक चैतन्य देशमुख यांना प्रभाग दहा मधून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. प्रभाग १० हा धनगर समाजाचा बालेकिल्ला समजला जातो. धनगर समाजाचे नेते श्रीकांत गाढवे व दिनेश गडदे यांनी चैतन्य देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे चैतन्य देशमुख यांना मोठं बळ मिळाले असून धनगर समाजातून देशमुख यांना वाढता पाठिंबा मिळतो आहे.मोहोळ चे जेष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख यांचा मागील अनेक वर्षांपासून चा धनगर समाजाशी असलेला स्नेहबंध खूप मोठा आहे. त्यांनी कधीही जात पात मानली नाही.
मानवता धर्म मानून सर्वधर्मीय लोकांची कामे त्यांच्या अडचणी सोडविण्याचे कार्य केले आहे. २०१२ साली सुवर्णा सुरेश गाढवे यांना सरपंच करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला होता. त्या मुळेच सुवर्णा सुरेश गाढवे यांना सरपंच पदाची संधी मिळाली होती.
त्याच कामाचा वारसा चैतन्य देशमुख व प्रसाद देशमुख या दोघा बंधूनी पुढे चालू ठेवला आहे. आज श्रीकांत गाढवे, दिनेश गडदे यांच्या सारख्या सामाजिक काम करणाऱ्या धनगर समाजातील नेत्यांनी चैतन्य देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिल्याने प्रभाग १० मध्ये मोठं बळ देशमुख यांना मिळाले आहे. येणाऱ्या काळात सर्वधर्मातील अनेक सामाजिक कार्यकर्ते चैतन्य देशमुख यांना पाठिंबा देतील असे प्रसाद देशमुख यांनी सांगितले. या प्रसंगी शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Total views : 4449