धाराशिवच्या राजकीय पटलावर नवीन हालचालीना वेग .
सुरंग. भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी सलगर यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार .
धाराशिव – प्रतिनिधी
धाराशिव : – धाराशिवच्या राजकीय पटावर नवीन हालचालींना वेग आला असून भाजपमधील सक्रिय कार्यकर्ता सुरंग सलगर यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. सलगर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर विश्वास टाकत अधिकृत प्रवेश केला आहे.
शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमुळे ओळख असलेल्या सलगर यांच्या मनोनिग्रहात झालेल्या या बदलाकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे. पक्षांतराची घोषणा होताच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सलगर यांचे स्वागत करत त्यांना पक्षाची भगवी पताका हस्तांतरित केली.
कार्यक्रमास आमदार कैलास पाटील तसेच माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी सलगर यांच्या प्रवेशाचे स्वागत करत, “संगठनाला नवी उर्जा मिळेल,” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या.
धाराशिवमध्ये आगामी राजकीय घडामोडींवर या प्रवेशाचा थेट परिणाम दिसू शकतो, अशी चर्चा आता शहरभर रंगत आहे. शिवसेनेत नव्या उमेदवाराची भर पडल्याने स्थानिक पातळीवरील ताकद वाढणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या अनपेक्षित राजकीय बदलामुळे धुळपेर सुरू असलेल्या स्थानिक राजकारणात नवी चैतन्याची लहर उमटल्याचे चित्र दिसत आहे.





















Total views : 4449