धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीला नवा आयाम .
रजनजी साळवी यांची संपर्कप्रमुख पदी निवड – माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत यांचे हार्दिक अभिनंदन .
धाराशिव – प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल करत समन्वयक तथा माजी आमदार राजनजी साळवी यांची धाराशिव जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या साळवी यांना विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माजी मंत्री आणि आमदार तानाजीराव सावंत यांनी साळवी यांच्या निवडीचे मनापासून अभिनंदन केले असून नव्या जबाबदारीत ते कार्यक्षमतेने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंत यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे पक्षांतर्गत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आगामी संघटनात्मक उपक्रम, अंतर्गत समन्वय आणि पक्षकार्य अधिक सक्षम करण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याचे स्थानिक पातळीवर सांगितले जात आहे.





















Total views : 4449