प्रभाग क्रमांक १७ मध्ये इस्माईल शेख यांना मतदारांचा वाढता पाठिंबा .
धाराशिव– प्रतिनिधी
धाराशिव येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे उमेदवार इस्माईल बाबासाहेब शेख यांच्या प्रचाराला स्थानिक नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यापूर्वी नगरसेवक म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेली विकासकामांची गती, प्रभागातील प्रत्येकाशी राखलेला संवाद आणि अडीअडचणीच्या वेळी तत्परतेने मदतीसाठी धावून जाण्याचा स्वभाव यामुळे नागरिकांचा विश्वास पुन्हा दृढ होत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे.
प्रचारा दरम्यान इस्माईल शेख यांना भेटण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत आणि त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या कार्यशैलीने लाभलेले समाधान आज पुन्हा एकदा मतदारांना आकर्षित करत असल्याची नोंद होत आहे.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी वाढली असली तरी इस्माईल शेख यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे आणि लोकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे राजकीय वातावरणात विशेष चर्चा रंगताना दिसते.





















Total views : 4449