तुळजापूर प्रभाग क्र. १० मधील माझ्या माता-भगिनी, बंधू, वडीलधारे आणि सर्व प्रिय मतदार बांधवांनो,
प्रचार संपला… मतदानही शांततेत आणि उत्साहात पार पडलं…
आता सर्वांच्या मनात एकच उत्सुकता — निकालाची.
या संपूर्ण प्रवासाकडे मी मागे वळून पाहतो तेव्हा मन भरून येतं… कारण प्रत्येक पावलावर
आपण दिलेला प्रेमाचा हात, विश्वासाची साथ आणि आधाराची ऊब
माझ्यासोबत होती.
आपण दिलेल्या पाठिंब्याने माझं मन खरंच भारावून गेलं आहे.मतदानाच्या दिवशी आपल्या डोळ्यांत दिसलेला विश्वास
माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे.
आता निकाल काहीही असो जनतेचा निर्णय हा माझ्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद आहे.आपल्या प्रत्येकाच्या मताधिकारातील श्रद्धा मी शिरोधार्य मानतो.
आज मी फक्त एवढंच सांगू इच्छितो—
आपण सर्व माझ्यासाठी कुटुंब आहात,
आणि तुमच्या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहीन.
मनःपूर्वक आभार…
मनापासून कृतज्ञता…
आपला,
आनंद जगताप





















Total views : 4449