भूम–परांडा–वाशी पट्ट्यात “किंगमेकर” म्हणून धनंजय दादा सावंत यांची जोरदार चर्चा !!
आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार नाव — कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
भूम–परांडा–वाशी परिसरात सध्या एकच नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे— धनंजय दादा सावंत. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व जिल्हा प्रस्थापित उपाध्यक्ष या पदांवर कार्यरत असताना त्यांनी केलेल्या विकासकामांचा ठसा आजही कायम आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव “किंगमेकर” म्हणून पुढे येत असून कार्यकर्ते व नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
स्थानिक प्रश्नांवर नेमकी पकड, सर्वसामान्यांशी जवळीक, विकासासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि कोणतेही काम वैयक्तिक दृष्टीने न पाहता सार्वजनिक हित सर्वात महत्त्वाचे मानणारा त्यांचा दृष्टिकोन — या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून धनंजय दादा सावंत आज संपूर्ण पट्ट्यात चर्चेत आहेत.
त्यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाची कामे :ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण व अनेक दुर्गम भागांमध्ये पहिल्यांदाच पायाभूत सुविधा उभ्या करणे पाणीपुरवठा योजनांसाठी सतत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांसाठी विशेष कामे राबवणे
शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना सातत्याने मदत आरोग्य, पथदुरुस्ती, स्थानिक सुविधा यासाठी जलद निर्णय घेऊन अंमलबजावणी ही सर्व कामे लोकांच्या मनात आजही ताजी असून त्यामुळेच परंडा–वाशी–तुळवडू परिसरातील नागरिक धनंजय दादा सावंत यांच्यावर विश्वास दाखवत आहेत.
दरम्यान, स्थानिकांमध्ये असा सूर आहे की,
“काम करणारा नेता कधीही विसरला जात नाही… आणि दादांनी केलेलं काम आपल्याला रोज दिसतं.”निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली चर्चा
आगामी निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या नेत्यांमध्ये धनंजय दादा सावंत हे अग्रस्थानी असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे. त्यांच्या संपर्कातील वाढ, नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यक्रमातील उपस्थिती आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे हा परिसर त्यांच्या प्रभावाखाली दिसत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
सावत यांच्या नेतृत्वगुणांमुळे व कार्यशैलीमुळे कार्यकर्ते विशेष सक्रिय झाले आहेत. अनेक ठिकाणी तरुणांची नवी टीम तयार होत असून “दादांसोबत उभं राहायचं” असा भाव निर्माण होत आहे.
भूम–परांडा–वाशी परिसरात सकारात्मक राजकारण, विकासाची दिशा आणि संघटनात्मक भक्कमपणा या सर्वांची सांगड धनंजय दादा सावंत यांनी उत्तम प्रकारे घातली आहे.
यामुळेच आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका किती प्रभावी ठरणार? — हा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे.





















Total views : 4449