ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वास
पुणे | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरवणारे, भूम–परंडा–वाशी मतदारसंघाचे विकासरत्न आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची पुणे येथील JSPM कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सामाजिक, विकासात्मक तसेच राजकीय विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली.
जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने झटणारे नेतृत्व म्हणून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याविषयी उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार व्यक्त केले. विकासकामांमधील त्यांची दूरदृष्टी, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहितासाठी घेतले जाणारे निर्णय यामुळे जिल्ह्याला नवी ओळख मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत राज्याच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत विकास, संघटनात्मक बळकटी आणि जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंके, ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र घोगरे सर, जिल्हा परिषद माजी गटनेते प्रकाश आष्टे तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही भेट केवळ औपचारिक न राहता जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित विचारमंथन करणारी ठरली. आगामी काळात विकासाभिमुख राजकारण आणि जनसेवेची नवी दिशा निश्चित करणारी ही भेट असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
— दैनिक त्रिशक्ती
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 13960