विद्यानिकेतन विद्यालयांचा दहावी परीक्षेत 100 टक्के निकाल
येरमाळा प्रतिनिधी ( सुधीर लोमटे )–
येरमाळा येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय व विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल यांनी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2025-26 मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळे विद्यालयाला हे घवघवीत यश मिळाले आहे.
या परीक्षेत नंदिनी प्रमोद पाटील व सिद्धांत मारुती बारकुल यांनी प्रत्येकी 98.40 टक्के गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला. प्रिया किरण मते हिने 95.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर प्राची प्रशांत थोरबोले हिने 94.40 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच सत्यम हनुमंत माळी (92.50%), सुदर्शन रमेश लकडे (92.20%), श्रद्धा अजित थोरबोले (91.20%) आणि उदय विकास जाधव (90.80%) यांनीही 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयाचा गौरव वाढविला. विद्यालयातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत.
विषयनिहाय विशेष प्राविण्यामध्ये विज्ञान विषयात सिद्धांत मारुती बारकुल यांनी 99 गुण तर नंदिनी प्रमोद पाटील यांनी 97 गुण मिळविले. गणित विषयात सिद्धांत बारकुल यांनी 98 गुण, प्रिया मते यांनी 97 गुण, तर नंदिनी पाटील व सुदर्शन लकडे यांनी प्रत्येकी 96 गुण प्राप्त केले. हिंदी विषयात सिद्धांत बारकुल यांनी 99 गुण तर नंदिनी पाटील यांनी 97 गुण मिळविले. सामाजिक शास्त्र विषयात नंदिनी पाटील यांनी 97 गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, प्रशासकीय अधिकारी अनिल डोके, विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. रोहिणी शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय बांगर तसेच संस्थेच्या सचिव तथा शाळेच्या डायरेक्टर सौ. स्वाती पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
























Total views : 12297