छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा मोहोळ तहसीलमध्ये उडाला फज्जा; तहसीलदारांच्या नियोजन शुन्य कारभाराचा नमुना .
➡️ राज्यमंत्री दर्जा असूनही राजन पाटील यांना शासकीय कार्यक्रमातून डावलले.
➡️ कर्मचारीच गायब रिकाम्या खुर्च्या-टेबलांमुळे ‘समाधान शिबिरा’चा उडाला फज्जा.
मोहोळ : – ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. 1 मध्ये अनेक टेबलांवर कर्मचारीच उपस्थित नसल्याने नागरिकांना म‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. 1 मध्ये अनेक टेबलांवर कर्मचारीच उपस्थित नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला व शासकीय अभियानाचा फज्जा उडाला. नस्ताप सहन करावा लागला व शासकीय अभियानाचा फज्जा उडाला.
तर दुसरीकडे राज्यमंत्री दर्जा असूनही भाजपाचे नेते राजन पाटील यांना मोहोळ येथील शासकीय कार्यक्रमात डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजन पाटील यांचा ‘पत्ता कट’?
आज शुक्रवारी, 8 मे 2026 रोजी मोहोळ तहसील कार्यालयात महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत होणाऱ्या या शिबिराला राज्यमंत्री दर्जा असलेले नेते राजन पाटील यांना निमंत्रितच करण्यात आले नाही, असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते असून त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे. असे असताना स्थानिक प्रशासनाने त्यांना शासकीय कार्यक्रमापासून दूर ठेवल्याने ‘जाणीवपूर्वक डावलले’ जात असल्याची चर्चा आहे. यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
‘समाधान’ ऐवजी ‘मनस्ताप’ शिबिर
शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या या शिबिरात नागरिकांच्या तक्रारी जागेवर सोडवणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते.
टेबल क्र. 14 – स्व घरगणना मार्गदर्शन: टेबलवर फक्त लाल कापड आणि 3 रिकाम्या खुर्च्या. एकही कर्मचारी उपस्थित नाही. नागरिक हेलपाटे मारत होते.
टेबल क्र. 17 – जन्म-मृत्यू नोंदी अर्ज (नगरपरिषद मोहोळ): या टेबलवरही शुकशुकाट. महत्वाचे दाखले काढण्यासाठी आलेले नागरिक ताटकळत उभे होते.
टेबल क्र. 11 – अकृषीक एन.ए. तरतुदी बाबत मार्गदर्शन: येथेही एक खुर्ची आणि रिकामे टेबल. एनए परवानगीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
टेबल क्र. 12 – बांधकाम कामगार कार्ड: या टेबलवरही कर्मचारी फिरकलेच नाहीत. कामगार वर्गाने नाराजी व्यक्त केली.
नियोजनशून्य कारभाराचा नमुना
सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या शिबिरात दुपारी 12:30 वाजेपर्यंत अनेक टेबल ‘ओस’ पडलेले होते. नागरिकांनी कामधंदा सोडून, उन्हातान्हात शिबिर गाठले. मात्र कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. “शासनाच्या योजना कागदावरच चांगल्या दिसतात. प्रत्यक्षात अधिकारी-कर्मचारीच नसतील तर सामान्य माणसाने दाद कुणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.
प्रशासनाचे दुर्लक्ष, राजकीय नेत्यांना डावलले
एकीकडे राज्यमंत्री दर्जाच्या नेत्याला कार्यक्रमात स्थान न देणे आणि दुसरीकडे नागरिकांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात कर्मचाऱ्यांचीच अनुपस्थिती, यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय अनास्था यामुळे शासकीय योजनांचा बोजवारा उडत असल्याचे या घटने पुन्हा सिद्ध झाले आहे.
या प्रकाराची तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व राजन पाटील यांना डावलण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




















Total views : 12297