धाराशिव : युवकांमध्ये सक्रिय नेतृत्व, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा यामुळे ओळख निर्माण केलेले युवा नेते अभिराम सुधीर पाटील यांची धाराशिव-कळंब विधानसभा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे राजकीय, सामाजिक तसेच विविध स्तरांतून स्वागत व कौतुक होत आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यासाठी अभिराम पाटील यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ग्रामीण भागात सातत्याने जनसंपर्क, सामाजिक उपक्रम आणि कार्यकर्त्यांशी समन्वय राखत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या निवडीमुळे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. युवकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता आणि कामाची तळमळ पाहता आगामी काळात पक्ष विस्तारासाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, अभिराम सुधीर पाटील यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 12309