वसमत (जि. हिंगोली) : विश्व हिंदू परिषद – मुंबई क्षेत्राच्या वतीने आयोजित परिषद शिक्षा वर्ष अंतर्गत देवगिरी-विदर्भ प्रांताचा शिक्षा वर्ग सध्या लाल बहादूर शास्त्री विद्यालय, वसमत येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे. या शिक्षा वर्गास स्नेहभेट देत अखिल भारतीय संघटन महामंत्री मा. श्री. मालिंदजी परांडे तसेच प्रांत मंत्री मा. श्री. योगेश्वरी गर्गे यांच्याशी विविध संघटनात्मक विषयांवर स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला.
यावेळी हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार, संघटन बळकटीकरण तसेच युवकांमध्ये राष्ट्रीय विचारांची जडणघडण या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी धाराशिव जिल्हा महामंत्री श्री. विजयराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष अँड. अजित गुंड पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुदर्शन साखरे तसेच श्री. अनिकेत नवले गजानन पाटील उपस्थित होते.
परिषद शिक्षा वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक बळ, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 12306