रामेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात..
जीवन जाधव औसा..
औसा तालुक्यातील रामेगाव येथे हरिभक्त परायण उज्वलानंद महाराज अचलबेट यांच्या कृपा आशीर्वादाने व सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या प्रेरणेने
औसा तालुक्यातील रामेगाव येथे केला 19 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्या अखंड हरिनाम सप्ताहात काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. हरी जागर हरिपाठ चक्रीभजन व किर्तन यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात या सात दिवसीय सप्ताहात रामेगाव गावात भक्तीने वातावरण प्रति पंढरपूर अवतरल्यासारखे भाविकांची गर्दी होते यावेळी नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे भाविकांसाठी आयोजन करण्यात येते रामेगाव येथील सात दिवसीय सप्ताहात ह भ प शौकत महाराज हाडगेकर..
ह भ प भक्तीताई महाराज रामेगाव,ह भ प निलेश महाराज किल्लारीकर ,ह भ प रतन महाराज आंबेगावकर,ह भ प विरनाथ महाराज निटूर,ह भ प आशाताई महाराज राऊत,
सह काल्याचे किर्तन ह.भ.प उद्धव महाराज कोळेवाडीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
तरी रामेगाव गाव सह परिसरातील भाविकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह समिती व
रामेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे…




















Total views : 12297