“जीवनदानासाठी मदतीचा हात; किडनी प्रत्यारोपणासाठी आमदार तानाजीराव सावंत यांचे आर्थिक सहाय्य”
आंबीच्या संतोष गांडाळ यांना दिलासा; सामाजिक बांधिलकीचा पुन्हा प्रत्यय
किडनी प्रत्यारोपणासाठी आमदार तानाजीराव सावंत यांची मदतीचा हात
आंबी येथील संतोष गांडाळ यांना आर्थिक सहाय्य; सामाजिक बांधिलकीचे दर्शन
आंबी, प्रतिनिधी : आंबी येथील श्री. संतोष सुरेश गांडाळ यांच्यावर होणाऱ्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी आर्थिक मदत उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या संतोष गांडाळ यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची अडचण लक्षात घेऊन आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. या आर्थिक सहाय्यामुळे गांडाळ कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. तानाजीराव सावंत यांची ओळख असून, त्यांच्या या मदतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सामाजिक जाणीव जपत गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी मदत करण्याची परंपरा कायम राखत डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा आदर्श निर्माण केल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.


















Total views : 13323