लोहारा-उमरगा मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; विकासकामांना गती देण्याबाबत मंत्री महोदयांचा शब्द
मुंबई : लोहारा-उमरगा मतदारसंघातील रस्ते विकास, प्रलंबित सार्वजनिक बांधकाम प्रस्ताव आणि विविध पायाभूत सुविधांच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती, नवीन विकासकामांचे प्रस्ताव, तसेच नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. विकासकामांना आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विषय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
बैठकीदरम्यान मंत्री महोदयांनी आनंद पाटील यांना मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचा शब्द दिला. तसेच जनहिताच्या कामांना प्राधान्य देत विकास प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
लोहारा-उमरगा मतदारसंघातील विकासकामांचा पाठपुरावा सातत्याने सुरू असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न अधिक वेगाने सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 13800