• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

लोहरा परिसरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक प्रहार१२ संशयित ताब्यात; ९.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

Sayyad Musa by Sayyad Musa
June 17, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

लोहरा परिसरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक प्रहार
१२ संशयित ताब्यात; ९.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ
 छायाचित्र : जप्त करण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने, जुगार साहित्य आणि कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी.
धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोहरा परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी छापेमार कारवाई करत १२ संशयितांना ताब्यात घेतले असून ९ लाख ३८ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना प्राप्त झालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे लोहरा येथील कानेगाव रोड तसेच माकणी चौक परिसरातील शंभूराजे हॉटेल येथे सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण सोमवंशी, श्री. सुरेश कासळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामचंद्र बहुरे तसेच QRT पथकातील अंमलदार व चालक यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान १३ संशयित निष्पन्न झाले असून त्यापैकी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर १ संशयित फरार आहे. संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अन्वये लोहरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संशयितांकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण ₹९,३८,९४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू, अवैध मद्यविक्री, अमली पदार्थांची तस्करी व विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलीस प्रशासनाच्या प्रभावी कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
— दैनिक त्रिशक्ती

Previous Post

Sayyad Musa

Sayyad Musa

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

लोहरा परिसरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडक प्रहार१२ संशयित ताब्यात; ९.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ

June 17, 2026

June 17, 2026

परंड्यात ANTF ची धडक कारवाई; ५७ हजारांहून अधिक किमतीच्या अंमली गोळ्यांसह एक जण जेरबंद

June 16, 2026

June 16, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
009020
Total views : 14201

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In