उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत तालुक्याच्या विकास प्रश्नांवर सविस्तर चर्चा; आनंद पाटील यांची प्रभावी मांडणी
( सय्यद कलीम मुसा )
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे यांची माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांनी सदिच्छा भेट घेत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांसह विकासाच्या विविध प्रस्तावांची आनंद पाटील यांनी प्रभावीपणे मांडणी केली.
तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे आणि जनतेच्या समस्या अधिक परिणामकारकपणे सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
विकास, जनसेवा आणि संघटनात्मक बळकटी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून तालुक्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या भेटीमुळे तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 14201