विवाह सोहळ्यात धनंजय दादा सावंत यांची उपस्थिती; वधू-वरांना दिले शुभाशीर्वाद
धाराशिव : परांडा रोडवरील गौडगाव फाटा येथील साई वैभव मंगल कार्यालयात भोरे व कदम परिवाराच्या विवाह सोहळ्याचा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. धनंजय दादा सावंत यांनी विशेष उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.
विवाह सोहळ्यासाठी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धनंजय दादा सावंत यांनी वधू-वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत संसारवेल सुख, समृद्धी व आनंदाने बहरावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.
भोरे व कदम परिवारांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. विवाह सोहळा आनंदी, उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडला. धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष प्रतिष्ठा लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




















Total views : 14767