शिंदेंच्या वाघाने फत्ते केली राजकीय मोहीम! ओमराजेंच्या निर्णायक भूमिकेमुळे विरोधकांच्या गोटात वाढली धडधड
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय रणनीतीने पुन्हा एकदा विरोधकांना धक्का दिला आहे. राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता असलेल्या या दोन नेत्यांच्या एकत्रित प्रभावामुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींना आता उघड स्वरूप प्राप्त झाले असून अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते विकासाच्या राजकारणाला पसंती देत सावंत-ओमराजे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे विरोधी गटातील अनेक नेत्यांची झोप उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांत भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा वेग, जनतेशी थेट संवाद आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने घेतलेली भूमिका यामुळे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आणि मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यांवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
अलीकडील राजकीय घडामोडींमुळे सावंत आणि ओमराजे यांच्या नेतृत्वाभोवती कार्यकर्त्यांची नव्याने मोट बांधली जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत या घडामोडींचे स्वागत होत असून आगामी काळातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या बदलत्या परिस्थितीमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता वाढली असून पुढील राजकीय डावपेच काय असतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे विकासाचा अजेंडा आणि दुसरीकडे जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे सावंत-ओमराजे यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजकारणातील या नव्या घडामोडीमुळे आगामी काळात जिल्ह्यातील सत्तासमीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |


















Total views : 14811