भूम नगरपरिषदेत अडथळ्यांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
भूम (प्रतिनिधी): शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे आणि माजी नगराध्यक्ष विकासरत्न संजय गाढवे यांनी आज आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची भेट घेत विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी भूम नगरपरिषदेतील प्रशासकीय कामकाजात जनशक्ती शहर विकास आघाडीच्या काही नगरसेवकांकडून सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. संबंधित नगरसेवकांच्या वर्तनामुळे विकासकामांवर परिणाम होत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
या भेटीदरम्यान नगरसेवक सुरज गाढवे, अभिजीत शेटे, रिमा शिंदे, तौफिक कुरेशी आणि भाग्यश्री माने उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन कशा प्रकारे पाहते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे भूम शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12301