“आरोग्यसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राची मने जिंकणारे नेतृत्व”
माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा
महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी आपल्या कार्यकाळात राज्यभर राबविलेल्या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लाखो गरजू रुग्णांना दिलासा दिला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांचे व्यापक जाळे उभे केले. या शिबिरांमधून अनेक रुग्णांना मोफत तपासणी, औषधोपचार तसेच शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळाला होता.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघापुरतेच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात त्यांनी विकासकामांबरोबरच लोकांशी जपलेला जिव्हाळ्याचा संवादही विशेष चर्चेत राहिला. आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, रस्ते आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याची भावना कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“लोकप्रतिनिधी कसा असावा” याचा आदर्श त्यांच्या कार्यपद्धतीतून राज्यातील जनतेने पाहिला, अशी प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त केली जात आहे. जनसंपर्क, प्रशासनावर पकड आणि विकासकामांतील सातत्य यामुळे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे नाव राज्यातील प्रभावी नेतृत्वांमध्ये घेतले जाते.
राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाल्याचेही बोलले जात आहे.




















Total views : 12315