“जयप्रकाश विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र”
इयत्ता 5वीचे 13 व 8वीचे 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र; परिसरात आनंदाचे वातावरण
रुईभर (ता. जि. धाराशिव), दि. 20 मे :
जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत एकूण 20 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या यशामुळे विद्यालयाने पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता पाचवीतील 13 विद्यार्थी तर इयत्ता आठवीतील 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
इयत्ता पाचवीतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे — आयुष अमोल किरदत्त (224), पार्थ लालासाहेब गायकवाड (198), गुंजन ज्ञानेश्वर जमदाडे (176), अरबाज आमिर शेख (174), योगीराज भरतरी लोमटे (164), प्रणाली बाबासाहेब ढोले (160), तिरुपती बाबासाहेब कोळगे (148), चतुर्थी किशोर घोडके (144), शर्वरी शंकर माळी (142), श्वेता शरद साळुंखे (130), प्रणव आप्पा निदाने (130), मानसी सिद्धार्थ हुंबे (124) यांचा समावेश आहे.
इयत्ता आठवीतील यशस्वी विद्यार्थी — माने अक्षरा रणजीत (232), जगताप भैरवी शरद (176), ढोले श्रावणी बाबासाहेब (164), डोंगरे गौरी काकासाहेब (156), सारंग युगंधरा विनय (152), घोडके प्रेम श्रीकांत (150), जावळे विश्वजीत शहाजी (140) यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अभिजीत घोळवे, विनय सारंग, भिमराव कांबळे, मोहन चव्हाण, योहान वसावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास डॉ. आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे, माजी जि. प. सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा. प. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन कांबळे यांनी मानले.





















Total views : 12318