निर्भीड नेतृत्वाची दमदार छाप आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कार्यशैलीला कार्यकर्त्यांची ठाम पाठींबा
धाराशिव :- ( सय्यद कलीम मुसा )
भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आरोग्य मंत्री आणि आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या कार्यशैलीतला धीर, स्पष्टपणा आणि निर्णयकौशल्यामुळे स्थानिक पातळीवर नवा राजकीय संदर्भ तयार झाल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळावा या तत्त्वावर काम करताना त्यांनी दाखवलेली तत्परता ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक ओळख बनली आहे.सावंत हे “जे मनात तेच स्पष्टपणे” मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणातील सभ्य भाषेत मुद्दे टाळण्याची प्रवृत्ती बाजूला ठेवून, परिस्थिती जस्सी तशी जनतेसमोर मांडण्याची त्यांची शैली लोकांपर्यंत पोचते. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की “नेतृत्व म्हणजे फक्त भाषण नव्हे, तर प्रश्नाच्या क्षणी शांत न बसणारा हात.”
स्थानिक पातळीवर उद्भवणाऱ्या अडचणी, प्रादेशिक समस्या किंवा प्रशासनातील तांत्रिक अडथळे… कोणताही विषय पुढे आला की त्यावर तातडीने चर्चा, विभागीय समन्वय आणि परिणाम दिसेपर्यंत चालणारा पाठपुरावा ही पद्धत सावंत यांनी सातत्याने कायम ठेवली आहे. या धडाडीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
“काम हाती घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही” हा त्यांचा स्वभाव मतदारसंघात अनेकदा प्रकर्षाने जाणवला आहे. तक्रारी ऐकून घेणे, संबंधित अधिकार्यांशी चर्चा करणे, आणि वेळेत निर्णय मिळवून देणे ही त्यांच्या कार्यशैलीची पायाभरणी असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
राजकीय क्षेत्रात संयम, स्पष्टता आणि जबाबदारी जपणारी पद्धत आजच्या काळात दुर्मीळ होत असताना, सावंत यांनी राखलेला संतुलित पण धडाडीचा दृष्टिकोन लोकांच्या अपेक्षेशी जोडला जात असल्याचे स्थानिक वर्तुळात बोलले जात आहे.मतदारसंघात निर्माण झालेल्य विश्वासाच्या या प्रवाहामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एकच भावना प्रकर्षाने दिसून येते
प्रश्न आला की सावंत उभे राहतात… आणि निर्णयापर्यंत पोचवतात.”





















Total views : 4449