धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 :
वार्ड क्रमांक 17 मधून समाजसेवक मगबूल अब्दुल करीम शेख (पत्रकार) रिंगणात
धाराशिव दि. १२ (प्रतिनिधी):
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 17 मधून लोकप्रिय आणि सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले समाजसेवक मगबूल अब्दुल करीम शेख (पत्रकार) यांनी उमेदवारी जाहीर केली असून मतदारांनी त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सन् 1990 पासून सतत सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या शेख यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विधवा महिलांना पेन्शन मिळवून देणे, गरजू कुटुंबांना आर्थिक व वैद्यकीय मदत करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, तसेच कोरोना काळात स्वतःच्या ॲम्बुलन्सद्वारे अनेक गरजवंत रुग्णांना मदत करणे अशा समाजोपयोगी कार्यांमुळे त्यांची ओळख एक विश्वासार्ह, कार्यक्षम आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून झाली आहे.
त्यांच्या “प्रत्येक गरजवंत नागरिकापर्यंत मदत पोहोचवणे हा माझा ध्यास आहे” या कार्यतत्त्वामुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
खॉंजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्लाह अलै यांच्या उर्सानिमित्त त्यांनी संस्थेच्या माध्यमातून एड्सबाबत जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच सामाजिक ऐक्य वाढवणारे उपक्रम राबवले आहेत.
वार्ड क्रमांक 17 मधील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास आणि आदर असून “या वेळेस खरी सेवा करणाऱ्यालाच संधी मिळायला हवी” असा सूर जनतेत उमटत आहे.
समाजकार्याच्या बळावर मगबूल अब्दुल करीम शेख आता धाराशिव नगरपरिषदेत जनतेचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाले आहेत, अशी चर्चा सध्या शहरात जोरात आहे.





















Total views : 4449