ईजोरा–शेलगाव रस्ता नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात!विकासाचा नवा अध्याय — नागरिकांचा आनंदाचा उत्स्फूर्त प्रतिसाद**
धाराशिव दि. १२ ( सय्यद कलीम मुसा ):
भूम–परंडा–वाशी विधानसभा मतदारसंघातील दीर्घ प्रतीक्षेनंतर ईजोरा–शेलगाव रस्ता नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पुलामुळे वाहतुकीचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विकासकामासाठी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले. राज्य शासनाच्या निधीतून हे काम सुरू झाले असून स्थानिक जनतेने आमदारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
“दरवर्षी पावसाळ्यात नदी भरल्यामुळे संपर्क तुटत असे, परंतु आता पुलामुळे सुरक्षित वाहतूक सुलभ होईल,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
शेतकरी, विद्यार्थी, तसेच आपत्कालीन सेवांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले — “आमदारांनी दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरला आहे. आमच्या भागात खऱ्या अर्थाने विकासाचे दार उघडले आहे.”





















Total views : 4449