पोलीस दलात शिस्तबद्धतेचा धूमधुमधडाका…!
चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई .
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या आदेशानुसार ही कारवाई .
प्रतिनिधी / लोहार
धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासनाने शिस्त आणि पारदर्शकतेच्या दिशेने पाऊल टाकत लोहारा पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे, सपोफौ निवृत्ती बळीराम बोळके, पोलीस अमंलदार आकाश मधुकर भोसले, आणि पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे या चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सदर अधिकाऱ्यांवर गु.र. क्र. 321/2025 नुसार कलम 7, 7(अ), 12 – भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत प्रकरण नोंदविण्यात आले असून, प्राथमिक चौकशीअंती त्यांना 13 नोव्हेंबर 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे.
ही कारवाई म्हणजे पोलीस दलातील जबाबदारी, पारदर्शकता आणि शिस्तबद्धतेला प्राधान्य देण्याच्या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी असल्याचे प्रशासन वर्तुळात मानले जात आहे.
जिल्हा पोलीस दलात या निर्णयामुळे चर्चांना उधाण आले असून, प्रामाणिक अधिकारीवर्गात समाधान व्यक्त होत आहे.





















Total views : 4449