मुरूम नगर परिषद सार्वञिक निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी बापूराव काका पाटील यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरूम नगर परिषद निवडणूकीसाठी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्याकडे दाखल केला. यावेळी युवा नेते शरण भैय्या पाटील, लातूर येथील शिरीष आप्पा उटगे, भाजपचे मुरूम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर,माजी नगराध्यक्ष रशीद शेख, धनराज मंगरुळे,गोविंद पाटील,गौस शेख,सुजित शेळके,श्रीकांत बेंडकाळे, राजू मुल्ला,आदींसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.प्रारंभी हनुमान मंदिर,सातूसय्यद येथे जाऊन दर्शन घेतले.यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी हनुमान मंदिर,सातूसय्यद येथे जाऊन दर्शन घेतले.याबरोबरच स्व.माधवरावजी काका पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 4449