धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत तडे? राष्ट्रवादी (शरद पवार गट) स्वतंत्र लढणार; नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर!
धाराशिव – प्रतिनिधी
धाराशिवच्या स्थानिक राजकारणात मोठी हलचल निर्माण करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी महाविकास आघाडीतून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही अधिकृतरीत्या घोषित करण्यात आला असून शहरातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
महाविकास आघाडीत मतभेद वाढत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे शहरात “कही खुशी तो कही गम” असे वातावरण पाहायला मिळत आहे.
या घडामोडींमुळे धाराशिवमधील निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात कोणत्या पक्षाला याचा फायदा होईल, कोणाला नाही, यावर सध्या तर्क–वितर्क सुरू आहेत.
राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढतीच्या घोषणेमुळे धाराशिवच्या राजकीय पटावर खळबळ उडाली असून आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.




















Total views : 4448