महिलांनी शेवटी लढा जिंकला
आहेर धानोरा गावातील पूजा बिअर बार बीड जिल्हा न्यायालय कायमस्वरूपी केले बंद
सरपंच सौ मोनिका बालासाहेब इंगोले यांच्या आंदोलनाला यश
बीड प्रतिनिधी महिलांच्या विरोधात दारू दुकान बंद आहे धानोरा बीड पासून जवळच असलेल्या परवानाधारक पूजा बियर बार दुकाना बाबत गावातील अनेक महिलांनी व सरपंच सौ .मोनिका बालासाहेब इंगोले यांनी वारंवार जिल्हाधिकारी व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन तसेच कोर्टामध्ये अपील करून आहेर धानोरा येथील पूजा बियर बार बंद करण्याचे आदेश बीड जिल्हा न्यायालयाने दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आहे धानोरा येथील गावातील महिलांनी कडाडून विरोध केला. यात प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढून अखेर बियर बार चे दुकान परवानाधारक बंद केले यासाठी स्थानिक स्तरावर आंदोलन सुद्धा केले. मात्र दारूचे परवानाधारक दुकान बंद करायचे कसे असा प्रश्न या महिलांसमोर उभा राहिला होता , सदर गंभीर विषय गावकरी महिलांनी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री अजित दादा पवार यांच्या समोर ही मांडला व दारूबंदी महिलांची मागणी पाहता राज्य उत्पादन शुल्क ऑफिस कडे वारंवार संपर्क करून पाठपुरावा केला गावकऱ्यांनी, महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे नियमानुसार निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीच्या निकालात दारू दुकानास विरोध असणाऱ्या मतांची संख्या आडवी बाटली 500 समर्थनार्थ मतांची संख्या. व उभी बाटलीसाठी 50 मतं पडली या निवडणुकीवर न्यायालयात परवानाधारकांकडून स्थगिती देण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाकडूनही तातडीने सुनावणी घेण्यात आली. व सदर प्रकरणी न्यायालयाकडून गावकरी महिलांच्या बाजूने निकाल देण्यात आला. त्यात परवानाधारकांनी स्थगिती उठवण्यात सुप्रीम कोर्टात धाव घेतली असले तरी न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून न घेता खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. न्यायालयाचे निर्णय मतमोजणी असलेली स्थगिती उठल्यामुळे या दारू दुकानात विरोध असणाऱ्या आडवी बाटलीला पाचशे मतं मिळाली त्यामुळे गावकरी महिलांचा यात विजय झाल्याने दारू दुकान परवाना कायमचा रद्द करून पूजा बियर बारला सील ठोकण्यात आले. त्यामुळे धानोरा गावातील बेवड्यांची संख्या कमी होईल. व सर्वसामान्य महिला नागरिकांना त्याचा त्रास आता होणार नाही, कारण शाळा जवळच असल्याने विद्यार्थी व गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता 24 तास दुकान उघडा असल्यामुळे गावात पंधरा वर्षांपासूनच मुले व नागरिक बेवड्यांची संख्या वाढली होती . त्याचा नाहक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागत होता. त्यामुळे सौ. मोनिका बालासाहेब इंगोले सरपंच यांनी पुढाकार घेऊन कायमची उभी बाटली आडवी केली. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 4449