धाराशिव – प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय वर्धापन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे, प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अभिमन्यू पवार, प्रदेश संघटक सुदर्शन तारक, प्रदेश संघटक बालाजी जाधव, तसेच तुळजापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री शरद पवार हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत, शिवश्री आकाश भैया मुंडे यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
या निवडीमुळे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला अधिक वेग येईल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
























Total views : 4449