मोहोळ मध्ये भाजपाच्या शितल क्षीरसागर व नगरसेवकांच्या प्रचाराचा नारळ फोडून नागनाथ महाराजांना साकडे ..!!
➡️ मोहोळच्या विकासासाठी भरगच्च निधी उपलब्ध करून देऊ – जयकुमार गोरे
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : – मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या सर्व भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या शुभहस्ते मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या चरणी नारळ फोडून करण्यात आला.
ही प्रचाराची सभा मोहोळचे माजी आमदार आदरणीय राजनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर (पूर्व) जिल्हाध्यक्ष मा. श्री. शशिकांत चव्हाण व ज्येष्ठ नेते प्रमुख मा. नागनाथ (भाऊ) क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
मोहोळ शहरातील मतदारांनी एक वेळ भारतीय जनता पार्टीला संधी द्या .मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकास भरभक्कम निधी मंजूर करून देऊ. असा विश्वास यावेळी पालकमंत्री मा. ना. जयकुमार (भाऊ) गोरे यांनी यावेळी दिला.
मोहोळ शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन या शहराचा कायापालट करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन. तसेच केंद्रात आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी व राज्यात आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार सक्षमपणे कार्य करत आहे. त्यांच्या कार्याची व विकासाची गंगा मोहोळच्या प्रत्येक कानकोपऱ्यात पोहचवण्यासाठी मोहोळ नगरपरिषदेत भाजपाची एक हाती सत्ता असणे गरजेचं आहे. यासाठी २डिसेंबर रोजी सर्व मतदार बंधू भगिनींनी भाजपच्या सर्व उमेदवारांना आपले बहुमूल्य मतदान करावे असे आवाहन यावेळी केले.
यावेळी श्री नागनाथ देवस्थानचे खर्गे महाराज, मा. सतीश (अण्णा) काळे, मा. शंकर वाघमारे, मा. प्रकाश चवरे, मा. रमेश माने, मा विकास वाघमारे, मा. बाळासाहेब गायकवाड, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर, युवा नेते मा. सोमेश क्षीरसागर, धनगर समाज नेते मा. माऊली हळणवर, प्रदेश परिषद सदस्य मा. संजीव खिलारे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मा. मुजीब मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष मा. सुरेश राऊत, मोहोळ नगरपरिषद प्रभारी मा. सुशील क्षीरसागर, युवा नेते मा. अंकुश (भैय्या) अवताडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ले आहेत.





















Total views : 4449