ऊसतोडणी जोमात शेतकरी मात्र संभ्रमात ——
लोहगाव/महेबुब शेख
धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन महिना लोटत आला
तरी अद्याप एकही साखर कारखानदार ऊसाचे अंतिम दर जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आधीच अतिवृष्टीमुळे मेटाकुळी आलेल्या शेतकऱ्याची अपेक्षा थोडं फार असलेल्या ऊस पिकावर अवलंबून आहे.
रक्ताचे पाणी करून जोपासलेल्या आपल्या ऊसाला योग्य दर मिळेल की नाही
ह्या विचाराने शेतकरी सध्या हावालदिल आहे .
आपला ऊस कुठल्या कारखान्याला द्यावे जेणेकरून आपल्या ऊसाला योग्य भाव भेटेल
या विचाराने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. सध्या ऊसतोड टोळी बघणे व ऊस कारखान्यास पाठवणे हेच चित्र गावोगावी दिसून येत आहे.





















Total views : 4449