दहीफळ येथील सटीच्या यात्रेला बुधवार पासुन प्रारंभ. (सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन)
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) – कळंब तालुक्यातील दहिफळ येथीलश्री खंडोबा यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
येथील चंपाषष्ठी (सटीच्या) मुख्य यात्रेला बुधवार (दि. २६ नोव्हेंबर) पासून सुरुवात होत असून यात्रेत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेकरूसाठी गेल्या १५ वर्षांपासून राजे ग्रुपच्या वतीने दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षीही मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची तयारी करण्यात आली आहे.
बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटेपासून दंडवतांना सुरुवात होते, सकाळी मानाचे नैवेद्य मिरवणूक,नंगर मिरवणूक, नंगर तोडणे व गाडा बगाडा मिरवणूक, ढोल पथक, लेझीम पथका सह धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी ७ वाजता ‘ एका पेक्षा एक अप्सरा ‘ या सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य सोंगाचा कार्यक्रम, तर सायंकाळी सात वाजता रूपाली पुणेकरसह, किशोर अहिरेकर मंडळ फलटणकर यांचा लोकनाट्य तमाशा शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता भव्य कुस्त्याचा कार्यक्रम तर सायंकाळी सात वाजता ‘गर्जा हा महाराष्ट्र संस्कृतीचा लोककलेचा ‘ आगळावेगळा कार्यक्रम अशाप्रकारे यात्रेत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला असून सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.





















Total views : 4449