अपक्ष उमेदवार विकास कदम यांची प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचारात जोरदार आघाडी – जनतेचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद
कळंब – प्रभाग क्रमांक 4 अ अनुसूचित जाती प्रवर्गातून सुरू असलेल्या कळंब नगर परिषद निवडणूक रणधुमाळीत अपक्ष उमेदवार विकास कदम यांनी आपल्या दमदार, सुनियोजित आणि जनतेशी थेट जोडणाऱ्या प्रचारामुळे अनपेक्षित अशी मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांमध्ये निर्माण झालेल्या उत्साहामुळे मिळणाऱ्या विक्रमी प्रतिसादामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.
जनतेशी थेट संवाद हा विकास कदम यांची ताकद आहे. घराघरांत जाऊन सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकणे, वृद्धांना सन्मान, महिलांशी संवाद, युवकांमध्ये प्रेरणा, व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा अशा पद्धतीने श्री. कदम यांनी “जमिनीवरील नेता” अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संवादातून स्पष्ट होते की ते केवळ निवडणुकीच्या काळात नाही तर पुढील पाच वर्षे जबाबदारीने काम करण्याचा इरादा बाळगून आहेत. तरुण आणि महिलांचा वाढता विश्वास यामुळे प्रभागातील युवक मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून “प्रभावी व तडफदार नेतृत्व” हे त्यांच्या बाजूने जाणारे मोठे घटक ठरत आहेत.
महिला मतदारांनी सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा याबाबत कदम यांनी मांडलेल्या ठोस धोरणांचे स्वागत केले आहे.
सुस्पष्ट दृष्टीकोन—विकासाची हमी देत कदम यांनी प्रभागातील रस्ते, नळयोजना, मलनिस्सारण, स्वच्छता व्यवस्था, स्ट्रीटलाईट, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, नागरिक सेवा केंद्रे, अंगणवाडी, उद्याने, क्रीडा विकास यासारख्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि अंमलात आणण्याजोगी योजना प्रचारात मांडल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवर अवलंबून न राहता नागरिकांबरोबर मिळून विकास घडवण्याचा त्यांचा निर्धार मतदारांना आकर्षित करत आहे. त्यांना वाढता प्रतिसाद पाहून मातब्बर नेत्यांनाही आश्चर्य वाटले. प्रभागातील अनुभवी जाणकारांच्या मते,
“विकास कदम यांच्यावरील वाढता उत्साह पाहता त्यांची निवडणुकीतील आघाडी स्पष्टपणे दिसत आहे. ”पक्षीय उमेदवारांच्या तुलनेत अपक्ष उमेदवार असूनदेखील त्यांच्याभोवती निर्माण झालेली सकारात्मक लाट हे या निवडणुकीचे खरे वैशिष्ट्य ठरत आहे. प्रभागातील सामान्य मतदारांमध्ये असा सूर ऐकायला मिळतो—
“विकास कदम काम करणारा माणूस, पक्षापेक्षा माणूस मोठा!” सध्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कदम यांचा प्रचार सर्वाधिक चर्चेत असून प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा मुकाबला करणे कठीण जात असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे ते या निवडणुकीतील सर्वात बलाढ्य उमेदवार म्हणून ठामपणे उदयास येत आहेत.





















Total views : 4449