धाराशिवच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत गुरव दांपत्याची चर्चेची दमदार एन्ट्री .
धाराशिव – प्रतिनिधी
शहरातील आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, गुरव संगीता सोमनाथ यांना शिवसेना (उ.बा. ठा) – काँग्रेस आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे शहराच्या राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाल्याचे दिसत आहे.
सोमनाथ गुरुजी हे दोन कार्यकाळ नगरसेवक राहिले असून, त्यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय अनुभवाची नोंद स्थानिक राजकीय वर्तुळ घेत असल्याचे बोलले जात आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या प्रभागात त्या काळात अनेक स्थानिक विकासकामांना वेग मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी सौ. संगीता गुरव यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत पुढे आल्याने धाराशिव शहरात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. विविध पक्षीय हालचालींमुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार बनत असल्याचे निरीक्षक सांगत आहेत.
धाराशिवच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळत असताना, सर्वच उमेदवारांकडे
नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. पुढील काही दिवसांत शहरातील राजकीय घडामोडी अधिक वेग घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.





















Total views : 4449