“मल्हार पाटील यांचा विवाहसोहळा उजळला; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीने उजळला समारंभ”
सय्यद कलीम मुसा
चि. मल्हार पाटील आणि चि. सौ. कां. डॉ. साक्षी यांच्या विवाहसोहळ्याला आज दिवसभर उत्साह, आनंद आणि मंगल वातावरणाची उधळण लाभली. विवाहस्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहिल्याने संपूर्ण सोहळ्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले.
मुख्यमंत्री साहेबांनी नवदांपत्याला मनःपूर्वक आशीर्वाद देत त्यांच्या नव्या जीवनप्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीमुळे पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची छटा स्पष्ट दिसत होती.
या प्रसंगी आमदार राणादादा पाटील, मेघ पाटील तसेच विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
समारंभस्थळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत केले.
सुंदर सजावट, शिस्तबद्ध आयोजन आणि आनंदी वातावरणामुळे विवाहसोहळा दिवसभर रंगतदार झाला. शुभेच्छांच्या वर्षावात संपन्न झालेला हा सोहळा पाहुण्यांच्या मनात कायमची सुंदर आठवण ठेवून गेला.

























Total views : 4449