प्रभाग १(ब) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निसाबी मसूद कुरेशी निवडणूकीच्या रणसंग्रामात ..!!!
सर्वसामान्यांच्या अडचणींना प्राधान्य देत काम करण्याची कुरेशीची शैली .
धाराशिव – प्रभाग क्रमांक १(ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार गट) तर्फे निसाबी मसूद कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या उमेदवारीची परिसरात चर्चाचर्चा सुरू झाली आहे. समाजाशी नातेसंबंध जपत, सर्वसामान्यांच्या अडचणींना प्राधान्य देत काम करण्याची त्यांची शैली ओळखली जाते. पती व मुलासह कुटुंबातील सर्व सदस्य सामाजिक कामात सदैव धावून जाणारे असल्याने “उपयुक्त कार्यकर्त्या” अशी निसाबी कुरेशी यांची ओळख स्थानिकांमध्ये झाली आहे.
महिलांमध्ये वाढत असलेला त्यांचा संपर्क व विश्वास लक्षात घेता प्रभागात वेगळीच राजकीय रंगत निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक समस्यांवर लक्ष देणे, स्वच्छता-निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न, नागरिकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे यांसारखे काही प्राथमिक मुद्दे त्यांनी आपल्या प्रचारात अधोरेखित केले आहेत.





















Total views : 4449