मोहोळमध्ये भाजपाचे कमळ फुलणार? मा आ राजन पाटील यांच्या अस्तिवाची लढाई .
➡️ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल शिरसागर यांना वाढता प्रतिसाद .
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : – एकच धून, मोहोळमध्ये निवडून येणार नागनाथ भाऊंची सून, अशी निवडणूक प्रचाराची कार्यकर्त्यामध्ये ओळख झाली असून, मोहोळ शहरांमध्ये क्षीरसागर कुटुंबातील नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या सून व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मोहोळ नगरपरिषदेचे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी शितलताई क्षीरसागर यांना मोहोळ शहरातून उदंड प्रतिसाद मिळत असून त्यांच्या जनसंवाद यात्रेला प्रत्येक प्रभागामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक निवडणुकीत ठेचा खाव्या लागणाऱ्या क्षीरसागर कुटुंबीयांच्या अंगावर गुलाल पडणार असून, मोहोळ मध्ये कमळ फुलणार असल्याची भावना कार्यकर्त्यातून व तालुक्यातील भाजपा नेत्यातून होत आहे.
मोहोळ मधील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर
झाल्यापासून शितल सुशील क्षीरसागर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानुसारत्यांनासोलापूरजिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ राहिलेले क्षीरसागर कुटुंबीयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला असून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी ही दिली. त्याच पद्धतीने त्यांनी प्रचार सुरू केला असून, ज्या दिवशी सोलापूर जिल्ह्याचे पालकम ‘त्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्या दिवसापासून त्यांनी प्रचारास प्रारंभ केला असून, शहरातील नाम वंत व्यापारी, पदाधिकारी व सर्वसाम ान्य मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून कमळ मनामनात रुजवण्याचा ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितल क्षिरसागर, सुशील शिरसागर युवा नेते सोमेश क्षिरसागर यांनी व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे. प्रचारासाठी येणारे फक्त चार दिवस उरले असून, आतापर्यंत भाजपाच्या उमेदवारांचा घरभेटीने एक राऊंड पूर्ण झाला आहे. येणाऱ्या चार दिवसात सभा, पदयात्रा करण्याचे आयोजन आहे. विरोधक फक्त विरोधात बोलण्याचे काम करत आहेत परंतु आम्ही विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यातून सांगितले जात आहे. माजी आ. राजन पाटील, माजी आ. यशवंत माने यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही भाजपाच्या विजयामध्ये हातभार लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
चौकट : – सुशील क्षीरसागर यांचे प्रभावी नेतृत्व
२०१५ला मोहोळ नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर प्रथमच सुशील क्षीरसागर सर्वाधिक मताधिकाने त्यांच्या प्रभाग १६ मधून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी प्रभागात अनेक विकासात्मक कामे करून ते अडीअडचणीच्या काळात कायम सोबत राहिले आहेत. मोहोळ शहरात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना काळातही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी त्यांच्या पत्नी शीतल क्षीरसागर यांना सुशील क्षीरसागर यांचे नेतृत्व प्रभावी ठरत आहे.भाजपाच्या उमेदवारांचा घरभेटीने एक फेरी पूर्ण केली आहे. प्रचारासाठी राहिलेल्या चार दिवसात सभा, पदयात्रा करण्याचे आयोजन आहे. विरोधक फक्त विरोधात बोलण्याचे काम करत आहेत परंतु आम्ही विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यातून सांगितले जात आहे. माजी आ. राजन पाटील, माजी आ. यशवंत माने यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही भाजपाच्या विजयामध्ये हातभार लागणार असल्याचे सांगितले जात आहे.






















Total views : 4449